मुंबई। नगर सहयाद्री - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. सुरुवातीला तिच्या या वक्तव्याचे अनेकांनी क...
मुंबई। नगर सहयाद्री -
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने भारतीय मुली आळशी असल्याचे वक्तव्य केले होते. सुरुवातीला तिच्या या वक्तव्याचे अनेकांनी कौतुक केले होते. पण आता तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्यावर खूप टीका होत आहे. अनेकांनी तिला महिलांचा अपमान करत असल्याचे म्हणत फटकारले आहे. आता सोशल मीडिया सेंसेशन म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेद हिने सोनाली कुलकर्णीने केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
अमित श्रीवास्तव नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामध्ये लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती अवाजवी असतात, याबाबत ती व्यक्त झाली आहे. पण आता सोनालीचे हे मत उर्फीला पटलेले नाही.
काय म्हणाली उर्फी जावेद?
तिने हा व्हिडिओ रिट्वीट करत म्हटले, "तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील होते. आधुनिक काळातील महिला त्यांची नोकरी आणि घरातील कामे दोन्ही सांभाळतात, त्यांना तू आळशी म्हणतेस? चांगले पैसे कमावणारा नवरा हवा, अशी मुलींची इच्छा असेल तर त्यात गैर काय?
शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालण्याचे मशीन म्हणून पाहिले. लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडाही मागितला जातो. त्यामुळे महिलांनो, तुमच्या अटी आणि मागण्या मांडण्यास घाबरू नका. होय, महिलांनी काम केले पाहिजे, हे तुझे म्हणणे बरोबर आहे, परंतु हा एक विशेषाधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही," अशा शब्दांत उर्फीने आपले मत मांडले आहे.
COMMENTS