मुंबई / नगर सहयाद्री - राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुना...
मुंबई / नगर सहयाद्री -
राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुनावणी पूर्वी कालच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई ठाकरे गटाची साथ सोडली. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे, चारच महिन्यांपूर्वी भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
वडील सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती. माझ्या वडिलांची एक राजकीय भूमिका असू शकते. मात्र, माझी स्वत: ची एक वेगळी राजकीय भूमिका असू शकते- भूषण देसाई
भूषण देसाई यांच्या शिवसेना-शिंदे गटातील प्रवेशामुळे स्थानिक राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भ्रष्ट व्यक्तीमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याची मागणी भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
भूषण सुभाष देसाई हे फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आले असल्याचा आरोप संदीप जाधव यांनी केला. भ्रष्ट आणि मलीन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजप आणि शिवसेनेची युती आहे. त्यामुळे एका मित्राने केलेली एक चूक दोन्ही पक्षांना महागात पडू शकते असेही जाधव यांनी म्हटले.
COMMENTS