अहमदनगर | नगर सह्याद्री- १७ वर्षीय कॉलेज युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंंकाळी केडगाव उपनगरात घडली. या प्रकरणी पीड...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
१७ वर्षीय कॉलेज युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंंकाळी केडगाव उपनगरात घडली. या प्रकरणी पीडितेच्या आईने रविवारी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांची १७ वर्षीय मुलगी केडगाव उपनगरात राहतात. तीने नुकतेच बारावीचे पेपर दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी त्या दोघी घरात असताना मुलगी त्यांना म्हणाली, मी बेडरूममध्ये झोपतेफ, मुलीने बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला. फिर्यादी घरात स्वयंपाक करत होत्या. काही वेळाने त्यांनी उघड्या असलेल्या बेडरूममध्ये पाहणी केली असता त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी तिचा परिसरात शोध घेतला पण ती मिळून आली नाही. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता ती तेथे पण नसल्याचे समोर आले.
दरम्यान मुलीच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या मोबाईलवर फोन आला व एक अनोळखी व्यक्ती फिर्यादीसोबत बोलली. तुमची मुलगी माझ्यासोबत असून ती सुखरूप आहेफ, असे सांगितले. त्या व्यक्तीने फिर्यादीला नाव सांगितले नाही. यामुळे फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत.
COMMENTS