नवी दिल्ली वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातून भयंकर घटना समोर अली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला आणि पत्नीला एकत्र पाहून पतीन...
नवी दिल्ली वृत्तसंस्था -
उत्तर प्रदेशातून भयंकर घटना समोर अली आहे. विवाहित प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला आणि पत्नीला एकत्र पाहून पतीने प्रियकराला बेदम मारहाण करून घराबाहेरील खांबाला बांधून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि प्रियकराला रुग्णालयात दाखल केले आहे.मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, एका गावात राहणाऱ्या पंकजचे प्रतिपाल यांची पत्नी प्रीती हिच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. हिमाचल प्रदेशातील एका खासगी कारखान्यात काम करत असताना त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. यादरम्यान, दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले, त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचं ठरवलं होतं.प्रितीचा पती प्रतिपाल याला याप्रकरणाबाबत कळताच तो पत्नीसह आदमपूर या गावी आला. पण तरीही प्रिती आणि पंकज यांच्यात बोलणं सुरूच राहिलं आणि त्यांचे प्रेम वाढतच गेलं. यादरम्यान, विवाहित प्रेयसी प्रितीने प्रियकर पंकजला भेटण्यासाठी घरी बोलावलं. पंकज प्रितीला भेटायला आला. मत्र, याचवेळी पती प्रतिपालने या दोघांना रंगेहाथ पकडलं.
पत्नीला बंद खोलीत दुसऱ्या पुरुषासोबत पाहून प्रतिपालच्या तळपायातली आग मस्तकात गेली. त्याने पंकजला लाथा-बुक्क्यांनी बेदम मरहाण केली. यामध्ये पंकज हा गंभीर जखमी झाला. तो बेशुद्ध पडला. पण, प्रतिपालचा राग शांत झाला नाही. इतकी मारहाण केल्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेल्या पंकजला त्याने घराबाहेरील खांबाला बांधलं.त्यानंतर पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमी प्रियकर पंकजला सीएचसीमध्ये दाखल केले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
COMMENTS