अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगरमध्ये अपघाताची एक मोठी बातमी समोर अली आहे. नगर मनमाड महामार्गावर तीन वाहनं एकमेकांसमोर आदळून भीषण अपघात घडल्...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अहमदनगरमध्ये अपघाताची एक मोठी बातमी समोर अली आहे. नगर मनमाड महामार्गावर तीन वाहनं एकमेकांसमोर आदळून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. हा अपघात ईतका मोठा होता की त्या ३ जण ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात बाबासाहेब नामदेव जठार , महेश बाबासाहेब खैरनाथ हे दोघे येवला तालुक्यातील असून व आणखी एक (नाव समजू शकले नाही) यांचा मृत्यू झाला आहे.
मिळेल्या माहितीनुसार,अहमदनगर मधील निंबळक बायपास रोडचे काम सुरू आहे. एका बाजूनेच वाहतूक सुरू असून दुसरी बाजू वाहतूकीसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या रोडवरून जाणाऱ्या पिकअपला आयशर टेम्पो व ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला.
अपघातात सुमारे आठ ते १० ते १२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिकअपमधील व्यक्ती देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असावा अशी माहिती पोलिसांकडून समजली. दरम्यान याप्रकरणी पोलीस अंमलदार बाबासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो व ट्रकवरील अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS