अहमदनगर | नगर सह्याद्री गेल्या काही वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे आरोग्य सेवेत मोठे योगदान राहिले आहे. सर्वसामान्य- गरजु रुग्णांवर मोफत व...
अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या काही वर्षांपासून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे आरोग्य सेवेत मोठे योगदान राहिले आहे. सर्वसामान्य- गरजु रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दरात उपचार करुन त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलविल्याचे काम हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे.अत्यावश्यक सेवेसाठीही हॉस्पिटलची यंत्रणा सज्ज असल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत.अशा सेवा कार्यात बँक फाऊंडेशनचा सहभाग असावा, या भावनेतून आम्ही आनंदऋषीजी हॉस्पिटलला अत्याधुनिक अशी कार्डीयाक अॅम्ब्युलन्स देऊन खारीचा वाटा उचलला असल्याचे प्रतिपादन आयसीआयसीआय बँक फाऊंडेशनच्या झोनल प्रमुख मोनिका आचार्य यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलला आय.सी.आय.सी.आय. ग्रुप ऑफ कंपनीचे आयसीआयसीआय फाउंडेशनच्या वतीने अत्याधुनिक अशी कार्डीयाक अॅम्ब्युलन्स देण्यात आली. यावेळी झोनल प्रमुख मोनिका आचार्य, रिजनल प्रमुख डी.एन. शिंदे, प्रोजेट प्रमुख दीपक पाटील, उमेश रासकर, राजीव गुल्लार, चेतन पाटोळे तसेच फेडरेशनचे सीए अजय मुथा, डॉ.वसंत कटारिया, डॉ.आशिष भंडारी, सुनील मालू, आनंद छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. सीए अजय मुथा म्हणाले, आचार्य आनंदऋषीजी यांच्या प्रेरणेतून या हॉस्पिटलचे सेवा कार्य सुरु आहे. या कार्यात अनेकांचे मोठे योगदान मिळत असल्याने हे कार्य अधिक व्यापक होत आहे. रुग्णांना उपचाराबरोबरच आधार देण्याचे काम या ठिकाणी होत आहे. समाजातील दु:ख कमी करण्याचा प्रयत्न हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु आहे. आज आयसीआयसीआय बँक फाऊंडेशनने या आरोग्य सेवेसाठी सीएसआर फंडमधून दिलेली कार्डियाक अॅम्ब्युलन्स अत्यावश्यक गरजेच्यावेळी उपयोगी पडणारी आहे. विविध कंपन्यांनी सीएसआर फंडाचा असाच विनियोग आनंदऋषीजी हॉस्पिटलसाठी केल्यास मानवसेवेचे मोठे कार्य होऊ शकते. याप्रसंगी डी.एन.शिंदे, दिपक पाटील यांनीही आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्याने आम्ही प्रभावित झालो असून, या कार्यात छोट्या मदतरुपी भेटीतून सहभागी झाल्याचा आनंद असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ.वसंत कटारिया यांनी हॉस्पिटलच्या विविध विभागाची व सेवा कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सुनिल मालू यांनी केले तर आभार आशिष भंडारी यांनी आभार मानले.
COMMENTS