नागपूर। नगर सहयाद्री - नागपूर मधील पारशिवनी तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. हे दोन्ही ह...
नागपूर। नगर सहयाद्री -
नागपूर मधील पारशिवनी तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. हे दोन्ही ही तरुण फिरायला नागपूरच्या पारशिवनी येथील तलावात गेले होते. यावेळी नौका नयन करताना ही दुर्देवी घटना घडली. यात नागपूरच्या भवानी जांगिड (वय 24) व पंकज जांगिड (वय 23) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नागपूरच्या महेश कॉलनी परिसरातील दोन्ही तरुण पाराशिवनी येथील बरेजा पंच कमिटीच्या तलावात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते दोघेही लाकडी नावेत बसले होते. मात्र ती नाव अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होती. यामुळेच नौकानयन करत असताना अचानक नाव उलटली. ज्यामध्ये दोन्हीही तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
फिरायला गेलेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेने दोन्हीही तरुणांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.
COMMENTS