नवी दिल्ली वृत्तसंस्था - समाजातून अनेक प्रेम प्रकरणांमध्ये घरच्यांच्या विरोधामुळे तरूण मुलं- मुली टोकाचा निर्णय घेतात घर सोडून पळून जातात. अ...
नवी दिल्ली वृत्तसंस्था -
समाजातून अनेक प्रेम प्रकरणांमध्ये घरच्यांच्या विरोधामुळे तरूण मुलं- मुली टोकाचा निर्णय घेतात घर सोडून पळून जातात. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे. एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एक तरूणी भर रात्री अंधारात तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जाते. तिथं जावून ती असं काही करत की त्याची सर्वत्र होतेय जोरदार चर्चा होतेय ज्यामध्ये एक तरूणी भर रात्री अंधारात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जाते.
उत्तर प्रदेशमधील हरदोई इथल्या बेहता गोकुळ परिसरातील ही घटना घडली आहे. तरूणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांच्या नात्याला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. काहीना काही कारण काढून तिला त्या तरूणासोबत काही लग्न होणार नाही, असं सांगत होते. या सर्वाला संबंधित तरूणी वैतागून जाते. एक दिवस रात्री अंधारात मुलाच्या घरी जाते, तिच्याजवळील फोनने ती एक व्हिडीओ बनवते.
लग्न केले तर मोनूसोबतच करणार, असं ती व्हिडिओमध्ये बोलते आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करते. यामध्ये ती सांगते की, मी घरातून रात्रीची निघून आली असून प्रियकराच्या घरात येऊन हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. जर माझा छळ झाला तर फाशी घेऊन जीवन संपवून टाकेल, असंही ती म्हणते.
तरूण आणि तरूणी हे दोघेही 20 ते 22 वर्षांचे असून मुलगी स्वत: मुलाच्या घरी गेली. त्यामुळे अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही. याबाबत जर तक्रार दाखल केल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल,पोलिसांनी असं सांगितलं
COMMENTS