पुणे। नगर सहयाद्री - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. जमिनीच्या बदल्यात शेत...
पुणे। नगर सहयाद्री -
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. सौरउर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबादला दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना वर्षाला हेक्टरी ७५ हजार रुपये देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थिती देर्शवली त्यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पाणी फाउंडेशनची गट शेती व्यवस्था पाहून गट शेती करण्यासाठी काहीतरी नवी योजना तयार करणे गरजेचे वाटते. शेतकरी दिवसा वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी आता करताना दिसत आहे'.
आता शेतकऱ्यांना दिवसाला बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी आता वीज पुरवठा करणारे फिडर सोलरवर करण्याचं काम हाती घेतं आहोत. शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ३० % फिडर आपण आता सोलारवर केले आहेत, असे ते म्हणाले.
सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती ३० वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. नापीक असलेल्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सौरउर्जा प्रकल्पासाठी करार पद्धतीने भाड्याने घ्यायला तयार आहोत. त्यासाठी वर्षाला ७५ हजार रुपये देणार, त्यावर दर दोन वर्षांला दोन टक्के दर वाढ देणार, असेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरू केली. केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये टाकणार आहे. विम्याच्या हप्ता भरण्याची आवश्यकात नाही. जवळपास दीडलाख शेतकऱ्यांना शेततळे दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS