नवी दिल्ली वृतसंस्था- उटी येथील एका शाळेत धाडसी खेळ खेळत असताना ही घटना घडली.आठवीतील विद्यार्थ्यांनी लोहाच्या गोळ्या खाण्याची पैज लावली. ही ...
नवी दिल्ली वृतसंस्था-
उटी येथील एका शाळेत धाडसी खेळ खेळत असताना ही घटना घडली.आठवीतील विद्यार्थ्यांनी लोहाच्या गोळ्या खाण्याची पैज लावली. ही पैज जिंकण्यासाठी 13 वर्षीय झेबा फातिमाने एकाच वेळी 45 लोहायुक्त गोळ्या खाल्ल्या. ज्यानंतर तिचा मृत्यू झाला.बाकी 6 मैत्रिणींनी देखील काही गोळ्या खाल्ल्या आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,लोहाच्या गोळ्यांबाबत हे काही पहिले प्रकरण नव्हते. यापूर्वी बिलासपूरमध्ये लोह आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्या खाल्ल्यानंतर उलट्या झाल्यामुळे शाळकरी मुलांची प्रकृती खालावली होती.वास्तविक, लोक एकमेकांना पाहून किंवा विचारून लोह, जीवनसत्त्वे, कॅल्शियमच्या गोळ्या खातात.
केसगळती रोखण्यासाठी, रक्त वाढवण्यासाठी, हाडांमधील ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता दूर करण्यासाठी ते मनानेच औषधे खरेदी करतात.सर्व सरकारी शाळांमध्ये इयत्ता 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या देण्याचा नियम आहे. त्यामुळेच उटी येथील शाळेतील शिक्षकांच्या केबिनमध्ये लोखंडी लोहयुक्त गोळ्या ठेवलेल्या होत्या.
COMMENTS