अहमदनगर | नगर सह्याद्री नेवासा तालुक्यातील सोनई येथे सहा गावठी कट्टे, बारा जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी पोलीसांनी जेरबंद केला असल्याची मा...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नेवासा तालुक्यातील सोनई येथे सहा गावठी कट्टे, बारा जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी पोलीसांनी जेरबंद केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील एक आरोपी गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी सोनईला घोडेगांव-चांदा रोडवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांना मिळाली होती. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स. पो. नि. गणेश वारुळे, पो. हे. कॉ.सुनील चव्हाण, रवी सोनटक्के, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापू फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पो. ना. शंकर चौधरी, भीमराज खर्से, दीपक शिंदे, पो. कॉ. विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर व अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सापळा लावला.
गळ्यात एक सॅक असलेला संशयित इसम त्यांना आढळला. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख (वय ३४, रा. कुकाणा, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता सहा गावठी बनावटीचे कट्टे व बारा जिवंत काडतूसे आढळुन आली. त्याच्यावर नेवासा व भिंगार येथेही गुन्हे दाखल असल्याचे ओला यांनी सांगितले.
COMMENTS