नांदेड। नगर सहयाद्री - नांदेडमधील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात...
नांदेड। नगर सहयाद्री -
नांदेडमधील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा दूरवर चेंडु सारखी फेकली गेली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. या घटनेने परिसरात हळ-हळ होत आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, आज सकाळी नांदेड ते मुदखेड या मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली ॲपरिक्षा जात होती. या वेळी समोरुन येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चेंडु सारखी दूरवर फेकली गेली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे नांदेडला रिक्षाने अनेकजण मजुरीसाठी जात होते. यानुसार आज देखील ॲपेरिक्षामध्ये जवळपास १५ प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. परंतु, कामावर पोहचण्यापुर्वीच रिक्षाला अपघात होवून काळाने घाला घातला.
COMMENTS