पुणे। नगर सहयाद्री - पुण्यातील भुसारी कॉलनी परिसरात असलेल्या एका जीमममध्ये ही धक्कादायक घटना घडली.एका ओपन जीममध्ये व्यायाम करत असताना एका २२...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यातील भुसारी कॉलनी परिसरात असलेल्या एका जीमममध्ये ही धक्कादायक घटना घडली.एका ओपन जीममध्ये व्यायाम करत असताना एका २२ वर्षीय युवकाला वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल शंकर नाकते (वय २२, रा. भूगाव) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंटचा काम करायचा. तो रोज संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानात मित्रांसोबत यायचा. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो जीममध्ये आला. दरम्यान, व्यायाम करत असताना, त्याला अचानक फोन आला.फोनवर बोलत असताना अचानक तो खाली कोसळला.
अमोलच्या मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच अमोलचा वाटेतच मृत्यू झाला होता. वीजेचा धक्का बसल्याने अमोलच्या पायची बोटे काळीनिळी झाली होती, असं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS