अहमदनगर | नगर सह्याद्री- एमआयडीसीमध्ये कंपनीतील सहकारी कामगाराचा खून केल्याबद्दल हरिकेश हरिचंद्र यादव (वय २५, रा. भरपूर्वा, बिहार) यास अहमदन...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
एमआयडीसीमध्ये कंपनीतील सहकारी कामगाराचा खून केल्याबद्दल हरिकेश हरिचंद्र यादव (वय २५, रा. भरपूर्वा, बिहार) यास अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी जन्मठेप आणि १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तीमजुरीची शिक्षा ठोठावली. अॅड. अर्जुन पवार यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
एमआयडीसीतील ए. एन. इंजिनिअरिंग वर्कस या कंपनीत काही कामगार कंपनीतील पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते. अजय पटेल (बिहार), प्रभुनाथ यादव (मध्यप्रदेश), हरिकेश यादव (बिहार), संदीप यादव (उत्तरप्रदेश) हे एकत्र राहत होते. त्यांच्यामध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी वाद झाले होते. अजय यादव हा शेजारच्या दुसर्या रूममध्ये झोपलेला होता, रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास टंण् टंण् असा आवाज आला. त्यामुळे तो उठला व त्याने पाहिले की, हरिकेश यादव याच्या हातामध्ये लोखंडी पाईप होता, तो प्रभुनाथ यादव (मध्यप्रदेश) यास पाईपाने मारत होता.
त्याने इतर कामगारांना आणि मालकाला फोन करून ही माहिती दिली. मालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याला फोन करून घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर मालक व पोलीस कंपनीमध्ये आले. त्यावेळेस प्रभुनाथच्या डोयाला मार लागलेला असून खूप रक्त गेलेले होते. तो काहीही हालचाल करत नव्हता. पोलिसांनी डॉटरांना बोलावून तपासले असता, त्यास मृत घोषित केले. कंपनीचे मालक अजय सोनवणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे पक्षातर्फे १० साक्षीदारांची साक्ष नोंदविली. तसेच आरोपीनेही न्यायालयामध्ये शपथेवर जबाब नोंदविला. न्यायालयामध्ये आलेल्या साक्षीपुराव्यापैकी फिर्यादी अजय सोनवणी, साक्षीदार अजय पटेल , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संदीपकुमार यादव, मयताचे शव विच्छेदन करणारे डॉ. प्रसाद लक्ष्मण सायगावकर व तपासी अमंलदार सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या साक्षी महत्वाचा ठरल्या.
अतिरिक्त सरकारी वकील पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरले आहे. हरिकेश यादव याच्याविरूध्द गुन्हा सिध्द झाल्याने जन्मठेप आणि १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तीमजुरीची शिक्षा ठोठावली. पोलीस हवालदार प्रबोध हंचे, एस. एस. देशमुख यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.
COMMENTS