नागपूर। नागपूर नगर सहयाद्री - नागपूरमधुन एक धक्कादायक बातमी हाती अली आहे. एका ४२ वर्षीय महिलेचे ४० वर्षीय पुरुषाशी अनैतिक संबंध होते. त्याल...
नागपूर। नागपूर नगर सहयाद्री -
नागपूरमधुन एक धक्कादायक बातमी हाती अली आहे. एका ४२ वर्षीय महिलेचे ४० वर्षीय पुरुषाशी अनैतिक संबंध होते. त्याला तिचे आणखी कुणाशीतरी अनैतिक संबंधअसल्याचा संशय होता. त्या दोघांमध्ये वेळोवेळी वाद झाला. हा वाद ईतका टोकाला गेला की तो तिला जंगलात घेऊन जाऊन,दगडाने ठेचत हत्या केल्याची घटना घडली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, ४५ वर्षीय मृत महिला पती, मुलगा आणि मुलगी कुटूंबासमवेत दिघोरीत वस्त्यव्यास होती. तिची दीपक इंगळे या ४० वर्षीय तरुणासोबत जवळीकता होती. दीपक हा स्टार बसमध्ये चालक आहे.ती त्याच्याशी नेहमी फोनवर बोलत असे. शिवाय तो तिच्या घरीही येत होता. तो मानलेला भाऊ असल्याचं घरी सांगायची.
दीपकला तिचे आणखी कुणाशीतरी अफेअर असल्याची कुणकुण लागली. संशयाचं भेट त्याचा मनात तडफड होत त्यामुळे तो संतापला होता. २३ मार्चला तो तिला घेऊन हिंगणा हद्दीतील जंगलात घेऊन गेला. तिथं त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला दगडाने ठेचले दीपकने तिच्या कपाळावर डाव्या बाजूला मारून हत्या केली.
पतीने शोध शोध केली बायको घरी न आल्यामुळे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.दीपकवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला. आठवड्यापूर्वीही दीपकने तिला त्या जंगलात नेले होते. पण, यावेळी तो संपवेल, याची पुसटशी कल्पना तिला नव्हती. दीपकने तिला जंगलात संपवले होते. तीन दिवसानंतर बेपत्ता महिलेचा मृतदेह हिंगणा हद्दीत बनवाडी शिवार येथे आढळला. आरोपीला वाठोडा पोलिसांनी अटक केली.
COMMENTS