मुंबई। नगर सहयाद्री - विधानसभेकडून संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार आहे. राऊतांवरील कार्यवाही संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण...
मुंबई। नगर सहयाद्री -
विधानसभेकडून संजय राऊत यांचे हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार आहे. राऊतांवरील कार्यवाही संदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेणार आहे. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यसभेच्या या अभिप्रायाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, खारदार संजय राऊत यांनी सत्तधाऱ्यांवर टीका करताना विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटलं होतं. त्यानंतर या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर मोठी टीका केली. भाजप आमदारअतुल भातखळकर यांनी या प्रकरणी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावाची मागणी केली होती. अशात आता हा मुद्दा केंद्र सरकारकडे जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे निर्णय घेणार
COMMENTS