लग्नाच्या चौथ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना नाशिक| नगर सहयाद्री - लग्न म्हंटलं की घरात आनंदाचे वातावरण असते. दाराला तोरण असतं. नातेवाईकांची ...
लग्नाच्या चौथ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना
नाशिक| नगर सहयाद्री -
लग्न म्हंटलं की घरात आनंदाचे वातावरण असते. दाराला तोरण असतं. नातेवाईकांची गर्दी असते. नाशिकच्या येवला तालुक्यात असाच एक विवाह १७ मार्चला विवाह झाला होता. थाटामाटात विवाह पार पड़ला नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते. नुकतीच लग्नगाठ बांधली होती, अशातच सासरी गेलेली नव वधू आनंदात होती. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले.
वृतसंस्थाच्या माहीती नुसार, पूनम सोपान कोल्हे या अठरा वर्षीय नवरीचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.हडप सावरगाव येथील सुखेदव कोल्हे यांचा मुलगा सोपान यांच्यासोबत पूनम हिचा विवाह झाला होता. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले. नवरी मुलीचा अचानक मृत्यू झाला संपूर्ण वातावरणच बदलून गेले होते. उंबरा ओलांडून आनंदात असलेली नवरी अचानक मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले.
अचानक झालेल्या या घटनेने येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील कोल्हे आणि कोळम येथील चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूनम वर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून कुटुंबाचा आक्रोश अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS