भंडारा। नगर सहयाद्री - भंडारा जिल्ह्यामधुन एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधआणण्यासाठी शेताकढे गेलेला आसता तो परत घरी न आल्यामुळे शोधा-शोध स...
भंडारा। नगर सहयाद्री -
भंडारा जिल्ह्यामधुन एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधआणण्यासाठी शेताकढे गेलेला आसता तो परत घरी न आल्यामुळे शोधा-शोध सुरु झाली. त्या दरम्यान तरुणाची हत्या झाल्याची माहित्ती मोहाडी तालुक्यातील रामपुर येथे उघडकीस आली आहे. गावालगतच्या शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार,प्रदीप लक्ष्मण धांडे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहाडी तालुक्यातील रामपूर- मांडेसर येथील प्रदीप धांडे हा शेतीसोबत पशु पालनाच्या व्यवसाय करीत होता. २२ मार्चला सायंकाळी शेतात बांधलेल्या जनावरांच्या दूध काढण्यासाठी गेला होता. दूध काढल्यानंतर दुधाची बकेट घेऊन घराकडे येण्यास निघाला. त्यावेळेस गावालगत असलेल्या शेतात अज्ञात आरोपींनी डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रदीप घरी परतला नसल्याने शेतात जाऊन बघितले असता प्रदीप यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेच्या पंचनामा केला आहे. प्रदीपच्या डोक्यावर जखम असल्याने प्रदीपची हत्या केल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे.
COMMENTS