अहमदनगर। नगर सहयाद्री - अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावरील कामरगाव शिवारात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेत भरधाव वेगात ...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
अहमदनगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावरील कामरगाव शिवारात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेत भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात ट्रकची पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण गंभीर जखमी झाले.देवदर्शनाहून येणाऱ्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भाविक हे देवगड आणि शनिशिंगणापूरचे देवदर्शनाहून घरी निघाले, पुण्याच्या दिशेने जात असताना. वाटतेच पुण्याहून-नगरच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक येत होता. दरम्यान, दोन्ही वाहने कामरगाव शिवारात आली असता, ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
ट्रक अनियंत्रित होऊन भाविकांच्या पिकअप वर जाऊन जोरदार धडकला. हा अपघात प्रचंड मोठा होता की यामध्ये ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. ११ भाविक गंभीर जखमी झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे.
देवदर्शनाहून येणाऱ्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच ,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ३ भाविकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
COMMENTS