मनमाड। नगर सहयाद्री - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. परीक्षेतकाॅपी कर...
मनमाड। नगर सहयाद्री -
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. परीक्षेतकाॅपी करुन दिली नाही याचा राग मनात धरुन शिक्षकावर हल्ला झाल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. या हल्ल्यात शिक्षक जखमी झाला आहे. निलेश दिनकर जाधव असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेचा कसून तपास सुरु असल्याची माहिती मनमाड पाेलिसांनी दिली.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सोमवारी दहावीचा विज्ञान 2 चा पेपर होता. यावेळी शिक्षक निलेश जाधव यांना बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपवण्यात आले होते. मनमाडमधील हक हायस्कूलमध्ये पेपर सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षक जाधव यांनी मुलांना कॉपी करु दिली नाही.
दरम्यान सुपरव्हिजनचे काम करणा-या निलेश जाधव यांना पेपर सुटल्यावर काम संपवून घरी जात असताना शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून काही मुलांनी दगडफेक केल्याने पालकांनी देखील तीव्र नाराज व्यक्त केली आहे. शिक्षक जाधव यांच्या तक्रारीनंतर मनमाड पोलिसांनी संध्याकाळी उशिरा अज्ञात विद्यार्थी यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व विद्यार्थी कोणत्या शाळेतील विद्यार्थी होते. हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS