नाशिक। नगर सहयाद्री - नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.एका तीन महिन्याच्या निष्...
नाशिक। नगर सहयाद्री -
नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.एका तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. गंगापुर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धृवांशी भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.निष्पाप चिमूकल्याचा जीव गेला असेल तर हळहळ व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नास नाशिक शहरातील गंगापूर सातपूर रोड नजीक असलेल्या धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे परिवारासह राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत कामला आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या.
एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात शिरली.या अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीच्या आणि तिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. रुमाला गुंगीचे औषध लावलेले असल्याने आई बेशुद्ध झाल्यानंतर या महिलेने घरातच झोपलेल्या तीन महिन्याच्या निष्पाप व निरागस चिमुकलीचा धारधार शस्त्राने गळा चिरला.
आज्जीने जोरात हंबरडा फोडला. दृश्य पाहून खरंतर आज्जीलाच मोठा धक्का बसला. तात्काळ याबाबत आज्जीने इतरांच्या मदतीने आपल्या मुलाला बोलविले. त्यामध्ये तात्काळ मुलगा हजर झाला तोपर्यन्त पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच चिमूकलीचा मृत्यू झाला होता.
COMMENTS