मालेगाव | नगर सह्याद्री- माझी आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे उद्धव ठाकरे यांना किती खोके गेले हे कळेल. मेव्हणे पाटणकर यांची ...
मालेगाव | नगर सह्याद्री-
माझी आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे उद्धव ठाकरे यांना किती खोके गेले हे कळेल. मेव्हणे पाटणकर यांची ईडी चौकशी थांबवावी म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केला.
मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी आ. कांदे यांच्यासह शिंदे गट, सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या टीकेचे कवित्त्व अद्याप सुरू आहे. प्रत्येकजण या टीकेला उत्तर देत आहे. विशेषतः सुहास कांदे यांनी त्यांच्यावरील टीकेचे तातडीने उत्तर दिले आहे. ‘एक कांदा ५० खोयाला जात असेल तर तुम्हाला किती खोके?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत उपस्थित करून
पाटणकरांची ईडी चौकशी थांबविण्यासाठीच राजीनामा
आमदार सुहास कांदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. याला उत्तर देत सुहास कांदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या या सभेतून उत्तर महाराष्ट्राने काय घ्यायचे? एकीकडे राहुल गांधींना अपात्र ठरवले म्हणून निषेध करायचा. दुसरीकडे सभेत राहुल गांधी सावकरांबाबत चुकीचे बोलले सांगायचे. ही फक्त टोमणे सभा होती. खोयांवरून माझी नार्को टेस्ट करावी आणि मी काही कंत्राटदारांची नावे सांगतो, त्यांनी उद्धव ठाकरेंना किती खोके दिले, याचीही नार्को टेस्ट करा. सर्वांना समजू द्या की उद्धव ठाकरे यांना किती खोके गेले की आम्हाला किती मिळाले.
कांदे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी भावनिक आवाहन करणे बंद करावे. पाटणकरांची ईडी चौकशी बंद होण्यासाठी ठाकरेंनी दिला. राज्याच्या जनतेसाठी राजीनामा दिला नाही. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर दोन दिवसांनी पाटणकरांची ईडी चौकशी बंद झाली. पाटकरणांची ईडी चौकशी होऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल.
COMMENTS