मुंबई। नगर सहयाद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा काल खेडच्या गोळीबार मैदानावर पार पाडली. राज्याच्या राजकारणात सध्या या सभेची चर...
मुंबई। नगर सहयाद्री -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा काल खेडच्या गोळीबार मैदानावर पार पाडली. राज्याच्या राजकारणात सध्या या सभेची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, दीपक केसरकरानी कोल्हापूर मध्ये बोलताना म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडा हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो. आम्ही फसवलं नाही. तुम्हीच आम्हाला सांगितलं, तुम्ही निघून जा. आणि आता जनतेला खोटं सांगत आहात. खोटं तरी बोलू नका," असा इशारा त्यांनी यावेळी केला.
"तुम्ही स्वत: पंतप्रधानांसमोर कबुल केलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याची तुमच्याकडून चूक झाली. हिंदुत्वाचा विचार सोडण्याची चूक झाली आहे. महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी चूक दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही दिल्लीतून आला. पण इथं आल्यावर तुम्ही शब्द मोडलेला असेल तर कोणी कुणाला फसवलं हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे, "असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.
COMMENTS