नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार ठार; अकरा जखमी

अहमदनगर / सुपा | नगर सह्याद्री- गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करून मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे निघाले...



अहमदनगर / सुपा | नगर सह्याद्री-

गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करून मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुयात कामरगाव शिवारात दोन ट्रक व एक छोटा ह्ती यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर ११ जण जखमी झाले. हे भाविक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुयातील आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते.

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, शिरूर तालुयातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील १६ जण एका छोटा ह्ती टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावर कामगारगावजवळ पुण्याकडून येणार्‍या ट्रकने दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूस पुण्याच्या दिशेने येत  असलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली. या दोन वाहनांचा अपघात झाला असतांनाच त्याच क्षणी अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेला कंन्टेनर अपघात ग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. 

भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याचे सांगण्यात आले. यामध्ये राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला. जखमींना नगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

गुढीपाडव्यापासून सुरू होणार्‍या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची काही नागरिकांची प्रथा आहे. त्यानुसार शिरूर तालुयातील हे भाविक देवदर्शनासाठी एकत्रितपणे बाहेर पडले होते. टेम्पोतून प्रवास करीत त्यांनी नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर आणि देवगड येथेही दर्शन घेतले. त्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या गावी निघाले होते. कामरगावजवळ मध्यारात्रीच्या सुमारा हा अपघात झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे. टेम्पामधील दहा व्यक्ती व ट्रक चालक असे अकरा व्यक्ती जखमी झाले आहेत. 



COMMENTS

Name

Accident,137,accident bharat,1,accidentbharat,2,ahmadnage,68,Ahmednagar,7990,Akole,23,BEED,1,bharat,3,bhavishya ahmednagar,2,braking,739,Breaking,5884,Business,9,corona,620,court bharat,2,Cricket,2,cricket bharat,3,Crime,1931,CRIME AHMEDNAGAR,6,crime buldhana maharastra,1,crime jalgaon maharastra,1,crime jalna maharastra,1,crime maharastra,18,crime nashik,1,e,2,economics,11,Editorial,31,education,162,educational maharastra,2,Entertainment,1584,Epaper,29,Health,467,indan,13,India,1422,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,krishi maharastra,2,krushi ahmednagar,2,KRUSHI MAHARASTRA,2,krushi solapur,1,loni,30,m,1,ma,2,Maharashtra,6118,maharastra,49,manoranjan,58,Mumbai,495,Nagar,291,nashik,2,nature maharastra,1,Newasa,67,Parner,3294,Parner Ahmednagar,127,Parner Ahmednagar,2,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,21,Politics,1850,politics ahmednaga,1,politics ahmednagar,15,politics bharat,3,politics maharastra,9,pune,4,Rahata,45,Rahuri,20,SadPadsad,20,sampadkiy,100,Sangamner,180,Saripath,46,Shevgaon,16,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,160,Shrirampur,10,social maharastra,3,Sport,283,sports,61,weather,34,World,224,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार ठार; अकरा जखमी
नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार ठार; अकरा जखमी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw11qJYKV7H-KaE_fEpZMGapRFYT1rkaLZeZJvyxH4AnsUWmUhsGnoQOW2u1FKEWJLBaVgjiOpDgR1jl5Nr6Cop9FY-cD71AGV1mPuybvvdLPl7AFiikzpthnVNGjHwNfSRckcv5S86cVjiFW8-gTW7Cn7eLT-ZEoUpHM9f4Yn64jYTTvuVShZ1Wwy/w640-h290/IMG-20230323-WA0210.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw11qJYKV7H-KaE_fEpZMGapRFYT1rkaLZeZJvyxH4AnsUWmUhsGnoQOW2u1FKEWJLBaVgjiOpDgR1jl5Nr6Cop9FY-cD71AGV1mPuybvvdLPl7AFiikzpthnVNGjHwNfSRckcv5S86cVjiFW8-gTW7Cn7eLT-ZEoUpHM9f4Yn64jYTTvuVShZ1Wwy/s72-w640-c-h290/IMG-20230323-WA0210.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/03/blog-post_199.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/03/blog-post_199.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content