मुंबई । नगर सह्याद्री - मागील काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातून सम...
मुंबई । नगर सह्याद्री -
मागील काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. एका विवाहित महिलाला भेटायला तिचा प्रियकर घरी आला. नवरा घरात नाही पाहून त्या दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण, याची कुणकुण पतीला लागली. पतीने दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं आणि त्याचा पायाखालची जमीनच सरकली आहे.
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत बघून पतीचा पारा चढला. त्याने प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, मारहाणात पत्नीच्या प्रियकराचा जागीच मृत्यू झाला आहे. आपल्या हातून खून झाल्याचे पाहून पती घाबरला आहे. त्याने गावाबाहेर त्याचा मृतदेह फेकून दिला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीची पत्नी हिमाचल प्रदेशातील एका खाजगी कंपनीवर काम करत असताना तिची तिथल्या एका पुरूषाची जवळीक वाढली आहे.
कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचाही प्रेमात इतका आकंठ बुडाला की, त्या दोघांनी एकत्र जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना माहिती होतं की आपल्या प्रेमाचा शेवट हा वाईट होऊ शकतो. म्हणून त्यांनी एकत्र मरण्याची शपथही घेतली होती.
काही दिवसांनी त्या महिलेच्या नवऱ्याला या अफेरयची भनक लागली. त्याने तातडीने बायकोला घेऊन हिमाचल प्रदेश सोडून गाव आदमपूर गाठलं आणि पत्नीच्या प्रियकराला समज दिली. तरी सुद्धा दोघांनी काही त्याचं ऐकलं नाही. दिवसेंदिवस त्यांचं प्रेम वाढत होते.
शेवटी तिने नवरा घरी नाही हे पाहून प्रियकराला गुरुवारी रात्री घरी बोलवले. अनेक दिवसांनी दोघे भेटल्यामुळे त्यांचा आनंदाला थारा नव्हता. दोघेही आनंदात असताना एकमेकांच्या मिठीत असताना अचानक नवरा तिथे आला आणि त्याने पत्नीला त्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. त्यातून त्याने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली आहे.
COMMENTS