मुंबई / नगर सहयाद्री - अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली असुन संतापजनक घटन...
मुंबई / नगर सहयाद्री -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली असुन संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, आरोपींनी १७ वर्षीय मुलीच वांद्रे येथून अपहरण केलं. त्यानंतर मुलीला गुंगीचे औषध देण्यात आलं व तेथून तिला वांद्रे येथून विरार येथील वज्रेश्वरी परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. एवढंच नव्हे तर मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना तिचा अश्लीष व्हिडीओ देखील बनवला.
याबाबत कुणाला काही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली. पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. आरोपींचं कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेसह तिच्या आईने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनीगुन्हा दाखल करत दोनआरोपीना अटक केली आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS