नवी दिल्ली वृत्तसंस्था- सिनेमाला लाजवेल अशी ही घटना हरयाणात घडली आहे. आईच्या हत्येचा राग मनात धुसफुसत होता. २० वर्षानंतर त्याने आपल्या आईच्य...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
सिनेमाला लाजवेल अशी ही घटना हरयाणात घडली आहे. आईच्या हत्येचा राग मनात धुसफुसत होता. २० वर्षानंतर त्याने आपल्या आईच्या मारेकरऱ्यांचा बदला पूर्ण केल्याची घटना घडली आहे. २० वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा बदला त्याने आता घेतला आहे. तरुणाने ६५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहीती नुसार, युवक अडिच वर्षांचा होता. त्याच्या डोळ्यसमोर आईचा खून करण्यात आला होता. आईच्या हत्येचा राग मनात धुसफुसत होता. आईच्या हत्या प्रकरणात तीन जण सामील होते. यातील दोन जणांचा आधीच मृत्यू झाला होता.
तर तिसरा व्यक्ती जिवंतहोता. सुरजीत असं त्याचं नाव होतं. रोहतक जिल्ह्यातील घिरोठी गावात शुक्रवारी रात्री ६५ वर्षीय सुरजीतच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन त्याची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी चौकशीदरम्यान सीसीटीव्ही फुटेजचा उलघडा घेतला आसता एक युवक रात्रीच्या वेळी मयत सुरजीतच्या घराकडे जाताना दिसत आहे. फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्य असल्याचा संशय आला. त्यांनी चौकशीसाठी सुनीलला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशीचा फास आवळताच सुनीलने हत्येचा गुन्हा कबुल केला आहे.
सुनीलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षांपूर्वी त्याचा आईचा खून तीन जणांनी मिळून केला होता. गावातील लोक माझी थट्टा करत होते. माझ्या आईचे मारेकरी जिवंत असून मोकाट फिरतातयेत आणि मी बदला घेऊ शकत नाही, असं येता जाता गावकरी माझी मस्करी करायचे.
आईच्या हत्येत सहभागी असलेल्या दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. फक्त सुरजीत जिवंत होता. म्हणून मी सुरजितच्या हत्येचा कट रचला. गायीच्या तबेल्यात झोपला असताना मी त्याच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून केला, असं कबुलीजबाब त्याने दिला आहे.
COMMENTS