मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. माझ्या धर...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. माझ्या धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन', असे म्हणत मनसेने गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा टिझर जारी केला. राज ठाकरे यांची हिंदूजननायक अशी प्रतिमा ठसवण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी गुढी पाडव्याला शिवतिर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडते. आता 22 मार्च रोजीही राज ठाकरे मनसे मेळावा घेणार आहेत. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी सैनिकांना राज ठाकरे यांच्या धडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. आता जारी केलेल्या टिझरवरुन राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे.
हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील, असे लिहिण्यात आले आहे. यानंतर राज ठाकरेंचे भाषण ऐकू येते. "माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन", असे राज ठाकरे म्हणत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व' असे लिहिण्यात आले आहे.
COMMENTS