अहमदनगर | नगर सह्याद्री- सामाजिक काम करतांना नेहमी पदाची अपेक्षा केली जाते. परंतु याला छेद देत आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पदाधिकारी, डॉटर्स, ...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
सामाजिक काम करतांना नेहमी पदाची अपेक्षा केली जाते. परंतु याला छेद देत आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये पदाधिकारी, डॉटर्स, कर्मचारी एका सामाजिक भावनेतून काम करत आहेत; हा समाजाकरीता एक आदर्श आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्याबाबत घेत असलेले शिबीरे सर्वसामान्यांकरीता सर्वोत्तम आहेत. अतिशय अल्प दरात उच्च दर्जा असलेली सेवा येथे दिली जाते. त्यामुळे रुग्णांचे व हॉस्पिटलचे जवळचे नाते निर्माण झाले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्य सेवेचा वसा जपला आहे. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी केले.
याप्रसंगी डॉ.प्राची चुडीवाल-गांधी व डॉ.अपर्णा पवार म्हणाल्या, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र्य दंत उपचार विभाग दिवसभर सुरु असून या ठिकाणी विविध आधुनिक मशिनरीद्वारे उपचार पद्धतीने रुट कॅनल, मेटल कॅप, सिरॅमिक कॅप, दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे, दातामध्ये सिमेंट भरणे आदि सुविधा उपलब्ध आहेत.
जैन सोशल फेडरेशन आयोजित आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे स्व.पन्नालालजी बोगावत एवंम केशरमलजी बोगावत स्मृतीप्रित्यर्थ बोगावत परिवार (धामणगांववाला) प्रायोजित मोफत दंत रोग तपासणी शिबीराचे उद्घाटन माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, संजय चोपडा, संतोष बोगावत, सतीश बोगावत, शरद बोगावत, सुनिल बोगावत, भानुदासजी कर्नावट, डॉ.प्राची चुडीवाल-गांधी, डॉ.अपर्णा पवार डॉ. संजय असनाणी, डॉ.कोमल ठाणगे, डॉ.प्रणव डुंगरवाल, डॉ.पुजा गायकवाड, डॉ.राजलक्ष्मी राय, डॉ.अमृता देडगांवकर, डॉ.आश्विनी पवार, डॉ.गौरव पाटील आदि उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा व आरोग्याबद्दल काळजी घेतली जाते. त्यामुळे गरीब रुग्णांचा या हॉस्पिटलवर विश्वास वाढला आहे. सामान्य रुग्णाला आजाराबाबत मोठा खर्च करणे शय नसते. त्यामुळे तो उपचार घेण्याचे टाळतो. परंतु या शिबीरातून अतिशय माफक दरात रुग्णांची तपासणी करुन उपचार केले जात आहेत. त्यामुळे हे शिबीरे रुग्णांकरीता वरदान ठरत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रायोजिक संतोष बोगावत म्हणाले, जैन सोशल फेडरेशन सातत्याने हे मोफत तपासणी शिबीरे घेत आहेत. यामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटल व रुग्ण यांची एक नाळ जुळली आहे. मानवतेचे मंदिर असलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल गरीबाची सेवा करण्याचे पुण्यकाम आमच्या हातून करुन घेत आहे. या माध्यमातून नकळत एक सेवा घडत आहे, याचे समाधान वाटते.याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा आदिंनीही मनोगतातून हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक केले.
प्रास्तविकात संतोष बोथरा म्हणाले, हॉस्पिटलच्या स्थापनेपासून आ.अरुणकाका जगताप व आ.संग्रामभैय्या जगताप यांचे नेहमीच सहकार्य लाभत आहे. या हॉस्पिटलची अरुणकाका जगताप नगराध्यक्ष असतांना मिळाली, त्यामुळे ही वास्तू उभी राहिली. आज हॉस्पिटलच्यावतीने होत असलेल्या सेवा कार्यात अनेकांचे योगदान आहे. या योगदानाच्या सहकार्याने विविध शिबीरांच्या माध्यमातून रुग्ण सेवा देत आहोत. अशा दानशूर व्यक्तींमुळेच आज हॉस्पिटलीची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. या प्रगतीचा व अत्याधुनिक सेवेचा लाभ सर्वसामान्यांना माफक दरात व्हावा. रुग्णांना पुणे-मुंबई सारख्या सुविधा या ठिकाणी मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न आहे. आज होत असलेल्या दंत तपासणी शिबीरामध्ये हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग सुरु करण्यात आला असून, या विभागात बारा तज्ञ डॉटरांची टिम कार्यरत असल्याचे सांगितले.
COMMENTS