सोलापूर। नगर सहयाद्री- रेल्वे मधून प्रवास करत असताना सदर घटना घडली आहे. तुमच्यावर बाहेरच्या लोकांनी करणी केली आहे, मला ते दिसत आहे. तुमच्या...
सोलापूर। नगर सहयाद्री-
रेल्वे मधून प्रवास करत असताना सदर घटना घडली आहे. तुमच्यावर बाहेरच्या लोकांनी करणी केली आहे, मला ते दिसत आहे. तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपीला सोलापुरातील पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी दागिने देखील हस्तगत केले आहेत. हुसेनसाब मखदुमसाब नदाफ आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे.
फिर्यादीच्या महितीनुसार, कर्नाटकातील इंडी ते सोलापूर असा रेल्वेमधून प्रवास करत असताना फिर्यादी आणि त्यांचे पती मुलाचे लग्न होत नसल्यासंदर्भात बोलत होते. त्यावेळी शेजारी बसलेल्या आरोपी नदाफ याने आपण बाबा असून मुलाचे लग्न होण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगितले. मोबाईल नंबर लिहून दिला. विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी फोन करून घरी बोलावले. घरी आल्यानंतर आरोपीने घरावर करणी झाल्याचा कारण सांगितलं. ही करणी दूर करण्यासाठी मोठी पूजा मांडावी लागेल असे सांगितले.
पूजेसाठी 15 हजार रुपये खर्च आणि स्वत: वापरलेले दागिने लागतील असे सांगितले.10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण देखील घेतले. दुसऱ्या दिवशी शहरातील एका मंदिरात पुजेसाठी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी फिर्यादींनी बाबास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद लागला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यावरुन अनोळखी आरोपीवर भांदवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी भोंदूबाबाचे नाव, पत्ता किंवा कोणतीच माहिती फिर्यांदीना नव्हती. केवळ मोबाईल नंबर या बाबाने फिर्यादींना दिला होता. त्याआधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिसनी तांत्रिक माहितीचा वापर करत तपास सुरु केला. 24 तासात आरोपी भोंदूबाबाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.
COMMENTS