नवी दिल्ली वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एक संतापजनक घटना घडली आहे. एका महिलेने दत्तक घातलेल्या ७ वर्षांच्या निष्पाप मुलीवर न...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एक संतापजनक घटना घडली आहे. एका महिलेने दत्तक घातलेल्या ७ वर्षांच्या निष्पाप मुलीवर निर्दयी अत्याचार केला. महिलेने त्या मुलीला ठिकठिकाणी इस्त्रीने जाळले, लाकडी दांडक्याने मारहाण केली, तिचा हात कोपरापासून तोडला. मुलीच्या गुप्तांगात लाकूड घातले. डॉक्टरांच्या उपचारानंतर या मुलाची प्रकृती काहीशी सुधारली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, चौकशीत असे आढळून आले की महिलेचा पती, आर्मी स्कूलमध्ये शिकवतो. त्यांनी दिल्लीतील एका अनाथाश्रमातील एका मुलीला दत्तक घेतले. डॉक्टरांनी मुलीच्या जखमा पाहिल्या आणि त्यांना संशय आला. त्यानंतर हा क्रूरपणा लक्षात आला. डॉक्टरांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या मुलीबाबत माहिती दिली. महिला डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता, जे समोर आले ते समजताच रुग्णालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. ७ वर्षीय मुलीच् गुप्तांगातून रक्त वाहत होते. कपडे बाजूला करताच रक्त येऊ लागले. रक्तस्त्राव थांबवण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले. उपचारानंतर मुलीची प्रकृती आता चांगली आहे.
ज्या महिलेने या मुलीवर अत्याचार केले त्याच महिलेने आणि पतीने मुलीला हॉस्पिटलमध्ये आणले रुग्णालय आणि डॉक्टरांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी घरातील मुलांमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. लहान भावाने मुलीला मारल्यानेतिच्या हाताला दुखापत झाली. त्याचा एक्स-रे काढण्यासाठी आलो आहोत, असे या अत्याचारी जोडप्याने रुग्णालयाला सांगितले.
मुलीवर क्रूर अत्याचार आणि वाईट वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपी महिला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. हे क्रूर दांपत्य मुलीला नोकरासारखे घरगुती काम करायला लावायचे. असे पोलिसांना तपासात आढळले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
COMMENTS