छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री - कौटुंबिक वाद न्यालयात प्रलंबित वादामुळे तारखे साठी आलेल्या पतीने एक धक्कादायक कृत केल्याची बातमी समोर अली ...
छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री -
कौटुंबिक वाद न्यालयात प्रलंबित वादामुळे तारखे साठी आलेल्या पतीने एक धक्कादायक कृत केल्याची बातमी समोर अली आहे. न्यायालयाच्या पार्किंगमध्येच पत्नीच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करीत त्याच्या गाडीच्या खिडकीतून आत हात टाकून त्यास पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासऱ्याची बोटेच जावयाने धारदार हत्याराने तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसा काजी अब्दुल वाजिद अब्दुल (६२, रा. प्रतापनगर) यांच्या मुलीचा विवाह अजहर खान अफजल खान पठाण याच्याशी झाला होता. कौटुंबिक वाद सुरू झाल्याने त्यांनी कायदेशीर मार्गाने काडीमोड करण्याचे ठरवले. त्यासाठी काजी मुलीसह न्यायालयाबाहेर येताच पार्किंगमध्ये असलेला जावई अजहर याने त्याची कार पत्नीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाच्या मागील बाजूने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजहरची कार सिग्नलपाशी अडकली असता काजी यांनी पाठलाग करत खिडकीतून हात घालत त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच अजहरने धारदार शस्त्राने त्यांच्या बोटांवर वार केला. यात त्यांच्या बोटांचे दोन तुकडेच पडले व रक्तबंबाळ अवस्थेत काजी रस्त्यावर कोसळले.
COMMENTS