अहमदनगर | नगर सह्याद्री आर्किटेस इंजिनिअर अँड सर्व्हेअर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवा आर्किटेस, इंजिनियर्स...
आर्किटेस इंजिनिअर अँड सर्व्हेअर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवा आर्किटेस, इंजिनियर्स यांना काम करण्याची ऊर्जा मिळत असते. असोसिएशनने सभासदांसाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे.सर्वांनी एकत्र येऊन यापुढील काळातही शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगले काम उभे करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आर्किटेस इंजिनिअर अँड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, असोसिएशनचे अध्यक्ष अन्वर शेख, उपाध्यक्ष रमेश कार्ले, सचिव प्रदीप तांदळे, मुकेश पल्लोड, रत्नाकर कुलकर्णी, विजयकुमार पादिर, मनोज दायमा, विजय दगडे, अजय दगडे, विकार काझी, अशोक मवाळ, बाबूजी ससाणे, संजय पवार, अनिल आठरे, विनोद काकडे, मानव निमसे, सुनिल हळगावकर, संकेत पादीर उपस्थित होते.
माजी कुलगुरू सर्जेराव निमसे म्हणाले की, जगामध्ये जेवढे इंजिनियर असतील त्याच्या निम्मे भारत देशामध्ये आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष अन्वर शेख म्हणाले की, सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या शहरासाठी चांगले काम उभे करायचे आहे, असे अन्वर शेख यांनी सांगितले. मॅरेथॉन स्पर्धा:प्रथम अमोल येनगंदुल, द्वितीय, प्रदिप तांदळे,तृतीय, प्रिन्स फुलसौंदर. फुटबॉल मॅच:विजेता संघ,शुभम खोले आणि टीम,फुटबॉल उपविजेता संघ, गौरव मांडगे आणि टीम, बेस्ट गोलकीपर, सैफ शेख,गोल्डन बुट - ओमकार म्हसे,बॅडमिंटन स्पर्धा :विजेता संघ, एसा सेक्रेटरी टीम, प्रदिप तांदळे आणि टीम, उपविजेता संघ एसा अध्यक्ष टीम, अन्वर शेख आणि टीम चेस स्पर्धा: विजेता - रोशन गुगळे, उपविजेता, वसीम सय्यद.कॅरम स्पर्धा:विजेता,राहुल पांडव व अभिजित शिंदे,उपविजेता, कमलेश पितळे व नितीन कोरडे,उत्तेजनार्थ,अभिजित देवी व महेश तांदळे.क्रिकेट स्पर्धा :विजेता संघ, प्रथमेश सोनावणे आणि टीम.उपविजेता संघ, गौरव मांडगे आणि टीम. मॅन ऑफ दी मॅच, जितेश सचदेव.अमित चिमनानी, संदिप ठूबे.बेस्ट बॅटसमॅन, प्रथमेश सोनावणे.बेस्ट बॉलर, गौरव मांडगे.
COMMENTS