सोलापूर / नगर सहयाद्री - आज संपाचा दुसऱ्या दिवस आहे. पारिचारिका आणि इतर वैद्यकीय स्टाफही संपावर गेला आहे. या सर्वांनी काम बंद आंदोलन केलं...
सोलापूर / नगर सहयाद्री -
आज संपाचा दुसऱ्या दिवस आहे. पारिचारिका आणि इतर वैद्यकीय स्टाफही संपावर गेला आहे. या सर्वांनी काम बंद आंदोलन केलं आहे त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. सोलापूर मधील एका रुग्णालयात गर्भवती महिला उपचारासाठी आली. ही गर्भवती महिला येताच या परिचारिकांनी आंदोलन सोडून तिला हात दिला अन् माणुसकीचं दर्शन घडवलं.
सोलापूरमध्ये आज दुसऱ्या दिवशीही शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. सोलापूरमधील परिचारिका आंदोलन करत होत्या. घोषणा देत होत्या. हा संप सुरू असतानाच इतक्यात एक गर्भवती महिला उपचारासाठी रुग्णालयात आली. ही महिला रिक्षातून आली. तिला खूप वेदना होत होत्या. हे पाहून आंदोलन करणाऱ्या महिला परिचारिका अस्वस्थ झाल्या. त्यांनी घोषणाबाजी बंद केली. अन् तात्काळ त्या महिलेला मदत करण्यासाठी धावल्या.
या परिचारिकांनी या गर्भवती महिलेला रिक्षातून उतरवले. तिला रुग्णालयात घेऊन गेल्या. या महिलेला अॅडमिट करून तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर या परिचारिका पुन्हा आंदोलनात आल्या आणि त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. या महिला आंदोलकांची ही माणुसकी पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला.
COMMENTS