परभणी / नगर सहयाद्री - परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शिक्षकांना...
परभणी / नगर सहयाद्री -
परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन शिक्षकांना जोरदार धडक दिली. अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे.रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ असे मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही शिक्षक मानवत येथील शकुंतला विद्यालयातील असल्याची माहिती आहे.दोघेही दुचाकीवरून आज पहाटेच्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले होते.
मानवत शहरातून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदारधडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही शिक्षकांची घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही शिक्षकांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच या घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
COMMENTS