छत्रपती संभाजीनगर / नगर सहयाद्री - देव दर्शनासाठी निघालेल्या दोन कुटूंबावर रविवारचा दिवस हा काळा दिवस ठरला. दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाच्...
छत्रपती संभाजीनगर / नगर सहयाद्री -
देव दर्शनासाठी निघालेल्या दोन कुटूंबावर रविवारचा दिवस हा काळा दिवस ठरला. दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाच्या कारला समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दोन बहिणींसह त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना यांचा जागीच मृत्यु झाला आहे. रात्री शहरात चार रुग्णवाहिकेतून सहा मृतदेह आणण्यात आले. संपूर्ण झाकलेल्या अवस्थेतील मृतांचे चेहरेही नातेवाईकांना पाहता आले नाही.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, प्रमिला बोरुडे वय-५८, त्यांचा मुलगा किरण बोरुडे वय -३५, सून भाग्यश्री किरण बोरुडे वय -२८, अशी एका बहिणीच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत तर हौसाबाई बर्वे वय -६०, सून श्रद्धा बर्वे वय -२७, नात जानव्ही बर्वे वय-११ अशी दुसऱ्या बहीण आणि त्यांच्या परिवारातील मृतांची नावे आहेत.
दोन्ही बहिणींचे कुटुंब हे शहरातच राहायला होते. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम एकत्रितपणेच साजरा करायचे. शेगावला दोन्ही परिवार सोबत जाताना समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले होते, तर सहा जखमींवर औरंगाबादेत उपचार सुरू होते.
रात्री शहरात चार रुग्णवाहिकेतून सहा मृतदेह आले. संपूर्ण झाकलेल्या अवस्थेतील मृतांचे चेहरेही नातेवाईकांना पाहता आले नाहीत. फक्त पायांचे दर्शन घेऊन सर्व सहा मृतांवर एकाच स्मशनाभूमीतअंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS