नागपूर। नगर सहयाद्री - नागपूरमधील भंडारा रोडवर ही घटना घडली. एका ट्रकला अचानक आग लागली. विशेष म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचे स...
नागपूर। नगर सहयाद्री -
नागपूरमधील भंडारा रोडवर ही घटना घडली. एका ट्रकला अचानक आग लागली. विशेष म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकला आग लागल्याचे चालकाच्या वेळीच लक्षात आले. आणि तो ट्रकमधून उतरला.ट्रक मसाल्याने भरलेला असल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मसाले घेऊन जात असणाऱ्या ट्रकने अचानक पेट घातल्याने बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली असल्याची माहिती समोर अली आहे. सुरूची मसाले कंपनी, उमिया धाम, नाका नं. ०५ येथे घडली. या घटनेत सुदैवाने चालक आणि त्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी ट्रकमधून लगेच उडी मारल्याने ते बचावले.
ट्रॅकला भीषण आग लागली. बघता बघता आगीत मसाल्याचे पोते आणि ट्रक जळू लागल्याने चालकाने वेळीच ट्रक उभा केला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण अग्निशमन दलाचे पथक दाखल होईपर्यंत ट्रकचे केबिन जळून खाक झाले होते. आगीच्या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
COMMENTS