लाखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने घेतले परिश्रम... राजू आगलावे। भंडारा / नगर सह्याद्री- रात्रीच्या सुमारास शिकारी...
लाखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने घेतले परिश्रम...
राजू आगलावे। भंडारा / नगर सह्याद्री-
रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात जंगलातुन शेत शिवारात भटकलेला बिबट एका शेतातील विहिरित पडल्याची घटना दिनांक ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालक्यातील सरांडी (बु.) येथे उघडकिस आली होती.घटने संदर्भ माहिती मिळताच, लखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने अथक परिश्रम घत, साडेपाच तासानंतर दिड वर्ष वय असलेल्या बिबट्याला पिंजऱ्याच्या साह्याने विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जिवदान दिले.
सदर बिबट हा सरांडी (बू) येथील रमेश गणपत राऊत नामक शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडल्याची माहिती मिळताच, वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट जिवंत असल्याची खात्री होताच लाखांदुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी घटनेची माहिती साकोलीचे सहायक वन संरक्षक रोशन राठोड यांना देत,वन्य जीव बचाव पथकाची मागणी केली.
गोंदिया वन विभागाच्या वन्य जीव बचाव पथकाच्या चमूने घटनास्थळी दाखल होवून पिंजऱ्याच्या सहाय्याने जवळपास ६० फुट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून जीवनदान दिले. दरम्याऩ बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS