बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टेन देखील खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार एमसी स्टेनला या शोची ऑफर मिळाली आहे.
मुंबई / नगर सह्यद्री -
बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टेन देखील खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार एमसी स्टेनला या शोची ऑफर मिळाली आहे. मात्र, आतापर्यंत एमसी स्टेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एमसी स्टेन बिग बॉस सीझन १६ जिंकल्यानंतर खूप व्यस्त झाला आहे. तो सातत्याने अनेक शो करत असून त्याची लोकप्रियताही पूर्वीपेक्षा वाढली आहे.
बिग बॉस शो सुरू झाल्यानंतर एमसी स्टेन खूप अस्वस्थ झाला होता आणि तो नेहमी घरी परत जाण्याचे सांगायचा. शो दरम्यानही त्याने बिग बॉसमधून बाहेर जाण्याची मागणी अनेकदा केली होती. शोचे अनेक भाग झाल्यानंतर त्याने गेम खेळायला सुरवात केली. आणि बिग बॉस सीझन १६ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली.
स्टंट आणि अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला रोहित शेट्टी लवकरच त्याचा खतरों के खिलाडी हा रिअॅलिटी शो सुरू करणार आहे. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. 'खतरों के खिलाडी'मध्ये बिग बॉसचे पूर्वचे स्पर्धकही सहभागी होणार आहेत. आतापर्यंत या शोमध्ये प्रियंका चहरचे नाव समोर येत होते, मात्र आता आणखी एक नाव समोर येत आहे.

COMMENTS