अल्पसंख्याक समाजातील एका व्यक्तीने व्हॉट्सअँप वर मुघल सम्राट औरंगजेबशी संबंधित स्टेटस पोस्ट केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रात औरंगजेबाबाबत राजकारण तापले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील तरुणाविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तरुणाने व्हॉट्सअँप स्टेटस टाकून औरंगजेबचे कौतुक केल्याचा आरोप आहे.
वडगाव पोलीस ठाण्यात कलम २९५ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाचे नुकसान करणे किंवा अपवित्र करणे) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सअँप स्टेटसवर बादशाह औरंगजेबची कथित स्तुती केली होती.
हे प्रकरण १६ मार्चचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पसंख्याक समाजातील एका व्यक्तीने व्हॉट्सअँप वर मुघल सम्राट औरंगजेबशी संबंधित स्टेटस पोस्ट केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पण्या पोस्ट करू नये.
COMMENTS