पारनेर | नगर सह्याद्री शासनाच्या विविध सोयी सुविधा व सवलतीचा लाभ मिळावा यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान व निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्...
पारनेर | नगर सह्याद्री
शासनाच्या विविध सोयी सुविधा व सवलतीचा लाभ मिळावा यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान व निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुयातील १६७ दिव्यांग व अपंग बांधवांना शासकीय प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,अशी माहिती निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेचे सुनील करंजुले यांनी दिली.
पारनेर येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये या प्रमाणपत्राचे वाटप आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. दुसरीकडे शासनाच्या वतीने हे प्रमाणपत्र मिळाल्याने ज्या विविध शासकीय योजना व अनुदान आहे त्याचा फायदा सुद्धा या अपंग व दिव्यांग बांधवांना होणार आहे. निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष सुनील करंजुले, अॅड. सुनीता घोडके, उज्वला वाळेकर, सुमन बाबर, ज्योती पाठक, राजेंद्र भुजबळ, गौतम आढाव, संतोष जाधव, संदीप पुंडे, तुळशीराम जाधव, शिवा कराळे यांनी या विशेष शिबिराचे आयोजन करून अपंग बांधवांना मदतीचा हात दिला आहे.यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव रासकर, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, दिपक लंके, खंडु भुकन, मारूती रेपाळे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, माजी सभापती सुदाम पवार, कारभारी पोटघन, मेजर बा.ठ.झावरे, दिपक लंके, दादा शिंदे, रा. या. औटी, डॉ बाळासाहेब कावरे, बबलू रोहकले, राहुल झावरे, विजय पवार, सचिन पठारे, किरण पठारे, अनिल गंधाक्ते, भागुजी दादा झावरे, सखाराम औटी, भाऊसाहेब भोगाडे, बाळासाहेब पुंडे , महेंद्र गायकवाड उपस्थित होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात दर बुधवारी या अपंग व दिव्यांग बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येते परंतु पारनेर तालुयातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक दिव्यांग व अपंग बांधवांना त्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. अनेक दिव्यांग अपंग बांधव या शासकीय प्रमाणपत्रापासून वंचित असल्याने आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले व पंधरा दिवसाच्या कालावधीतच पारनेर तालुयातील १६७ दिव्यांग अपंग बांधवांना हे प्रमाणपत्र मिळून दिले आहे.
COMMENTS