चेन्नई पोलिसांनी दागिने चोरीप्रकरणी ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी आणि तिचा ड्रायव्हर व्यंकटेशन यांना अटक केली.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्या घरात दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. चोरीनंतर चेन्नई पोलीस तपासात गुंतले होते, त्यानंतर या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आला आहे.
ऐश्वर्या रजनीकन हिने चोरी प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासोबतच घरातील इतर काही दागिनेही चोरीला गेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या घरातील नोकरांवर संशय आला, त्यानंतर चेन्नई पोलिसांनी दागिने चोरीप्रकरणी ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी आणि तिचा ड्रायव्हर व्यंकटेशन यांना अटक केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यांनी घरातील सर्व नोकरांची विचारपूस केली. तपासादरम्यान मोलकरीण ईश्वरी हिने घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली असून, त्यात सोन्याच्या दागिन्यांसह ३० ग्रॅम हिऱ्याचे दागिने आणि ४ किलो चांदीही होती. ईश्वरीची चौकशी केली असता, घराचा चालक व्यंकटेशन याचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.
ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी गेल्या १८ वर्षांपासून तिच्या घरी काम करत होती, त्यामुळे तिला घराच्या प्रत्येक कोपऱ्याची पूर्ण माहिती होती. तसेच, लॉकरच्या चाव्या आणि दागिन्यांची माहितीही तिच्याकडे होती. हे दागिने चोरून विकून त्यातून घर विकत घेतल्याचे ईश्वरीने सांगितले. लॉकरमधून एक एक करून दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ऐश्वर्या रजनीकांत लाल सलाम चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शनाकडे परतणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ऐश्वर्याचे वडील रजनीकांतही दिसणार आहेत.
COMMENTS