अहमदनगर | नगर सह्याद्री श्रीरामपुर तालुक्यातील निमगाव खैरी येथे गावठी कटृा व दोन जिवंत काडतुसे बाळगणार्या प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंक...
अहमदनगर | नगर सह्याद्री
श्रीरामपुर तालुक्यातील निमगाव खैरी येथे गावठी कटृा व दोन जिवंत काडतुसे बाळगणार्या प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके (वय २३, रा. घायगांव, ता. वैजापुर) या आरोपीला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणारा एक इसम श्रीरामपुर तालुयातील निमगांव खैरी गांवातील हॉटेल गितगंगा जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदारांचे पथक नेमुन कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.हे.कॉ. विजयकुमार वेठेकर, पो.ना. शंकर चौधरी, सचिन आडबल, संदीप दरदंले, राहुल सोळुंके व पो.हे.कॉ.संभाजी कोतकर यांनी निमगांव खैरी गांवातील हॉटेल गितगंगा येथे सापळा लावला.
एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसला. पथकाची खात्री होताच संशयीतास ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचे नाव प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके (वय २३, रा. घायगांव, ता. वैजापुर, जिल्हा औरंगाबाद हल्ली रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर) असे सांगीतले. त्याची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्याने गावठी कट्टा व जिवंत काडतुस प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे (रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर) यांचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. परंतु पोलीसांना तो सापडला नाही.आरोपी प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व आर्म ऍ़ट असे गंभीर स्वरुपाचे एकुण - १० गुन्हे दाखल आहेत. कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
COMMENTS