मुंबई - आलिया भट्टने आपल्या सिनेकारकिर्दीत बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आलिया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध तर आहे, पण एक बिझन...
मुंबई - आलिया भट्टने आपल्या सिनेकारकिर्दीत बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आलिया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध तर आहे, पण एक बिझनेस वुमन म्हणूनही प्रसिद्ध आहे. आलिया एक बॉलिवूड अभिनेत्री, मुलगी, सून, पत्नी, आई तसेच बिझनेस वुमन आहे. आलियाने नेहमीच ’हम भी किसी से कम नही’ असे म्हणत स्वत:चे स्थान सिद्ध केले आहे.
आलिया भट्टचा १५ मार्च रोजी अर्थात आज वाढदिवस आहे. आलिया सुरुवातीपासूनच करिअर ओरिएंटेड आहे. ती केवळ एक प्रख्यात अभिनेत्री नाही तर एक बिझनेसवुमन म्हणूनही खूप चर्चेत आहे. आलियाने नुकताच स्वतःचा उपक्रम सुरू केला आहे. अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणात तिचे फॅशन लेबल एड-ए-मम्मा पुन्हा लाँच केले. आलियाने हा व्यवसाय ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू केला होता. हा किड्स वेअर ब्रँड असून त्यामध्ये तिने मॅटर्निटी आउटफिट्स देखील समाविष्ट केले आहेत.
आलियाच्या बिझनेसची सर्वत्र चर्चा होत असते. कारण आलियाने हे फॅशन लेबल केवळ १६०० आउटफिटसह सुरू केले आणि आता त्याची संख्या एक कोटीपर्यंत पोहोचली आहे. आलियाने याआधी केवळ एका ऑनलाइन पोर्टलने आपल्या बिझनेसची सुरुवात केली होती. परंतु आतापासून तिच्या कपड्यांचे ब्रँड अनेक स्टोअरमध्ये आणि पोर्टलवर उपलब्ध आहे. हा ब्रँड ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.
अॅड-ए-मम्मा व्यतिरिक्त, आलिया इतर अनेक प्रोजेक्टमध्ये तिने गुंतवणूक केली आहे. आलियाने कंपनीतही आपले शेअर्स गुंतवले आहेत. ही कंपनी पाण्यात फेकल्या जाणार्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करते. याशिवाय, अभिनेत्रीने सौंदर्य आणि फॅशन प्लॅटफॉर्म नायका आणि वैयक्तिक स्टाइलिंग प्लॅटफॉर्म स्टाईल क्रॅकर मध्येही गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना आलिया म्हणाली होती की, जेव्हा मी स्वतःला त्या संस्थेच्या व्हिजनशी जोडताना पाहते तेव्हा मी पैसे गुंतवते.
दहा वर्षांच्या कारकिर्दीत आलिया भट्ट करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे. तिची एकूण संपत्ती २९९ कोटी रुपयांची आहे. फोर्ब्सच्या सेलिब्रिटींच्या यादीनुसार, आलियाने २०१७ मध्ये सुमारे ३९.८८ कोटी, २०१८ मध्ये ५८.८३ कोटी आणि २०१९ मध्ये ५९.२१ कोटी कमावले. थोडक्यात सांगायचे तर आलियाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ६० कोटी इतके आहे.
COMMENTS