मुंबई नगर सहयाद्री - आगामी लोकसभा २०२४ लोकसभा जागा काबिज करण्यासाठी महाविकास आघाडीची रणनिती ठरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत पर...
मुंबई नगर सहयाद्री -
आगामी लोकसभा २०२४ लोकसभा जागा काबिज करण्यासाठी महाविकास आघाडीची रणनिती ठरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेत पराभूत करण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे.पंतप्रधान मोदींच्या विरोधात उभा राहणारा विरोधी नेता कोण ही चर्चा सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,नितीन गडकरी म्हणाले, 'क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. मात्र, चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे. मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगले काम केले आहे, देशात झालेला बदल हा सरकारच्या कामाचा पुरावा आहे'
दुसरीकडे गडकरींनी आपल्या खात्यावर सुद्धा एकही भष्ट्राचाराचा आरोप झाला नसल्याचं सांगितलं आहे. आम्ही संपूर्णपणे पारदर्शक व्यवस्था केली असून ऑडिट हे खूप महत्वाचे आहे आणि त्याच वेळी परफॉर्मन्स ऑडिट देखील जास्त महत्वाचे आहे, असंही गडकरी म्हणाले.
COMMENTS