मुंबई। नगर सहयाद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.मुंबई उच्च न्...
मुंबई। नगर सहयाद्री -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही आज हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील कागलच्या निवासस्थानी ED अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. आज सकाळपासूनच पुन्हा पडताळणी सुरू केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,सत्तेत आल्यापासून सातत्याने विरोधकांना लक्ष केलं जात आहे.हसन मुश्रीफ यांनी ५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोमय्या यांची चौकशी करण्यात यावी अशी याचिका हसन मुश्रीफ यांनी दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई,आरोपपत्रही दाखल करू नये याबाबत पोलिसांना निर्देश देण्याची मागणी देखील केली होती.
धाडीचं कारण काय?
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. तसेच या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीचा ससेमिरा मुश्रीफांच्या पाठीशी लागला. मात्र कालच मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. २४ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे न्यायालयाचे ईडीला निर्देश देण्यात आले होते. मात्र तरी देखील आज ईडीने मुश्रीफांच्या घरावर धाड टाकली आहे.
COMMENTS