मुंबई /नगर सह्याद्री - अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कपूर कायम चर्चेत असतात. बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल म्हणून त्यांची ओळख आहे...
मुंबई /नगर सह्याद्री -
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कपूर कायम चर्चेत असतात. बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या आलिया आणि रणबीर मुलगी राहा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगताना दिसत आहेत. राहा हिच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता रणबीर कपूर याने मुलगी राहा हिच्याबद्दल नाही तर पत्नी आलियाबद्दल अनेक गोष्टी एका talk शो मध्ये सांगितल्या आहेत. पत्नी आलियासोबत भांडण झाल्यावर तो काय करतो… याबद्दल रणबीर त्याने सांगितलं आहे.
अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या व्हॉट, वूमन या चॅट शोमध्ये त्याने खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. आलिया हिच्यासोबत भांडण झाल्यावर काय करतोस? असा प्रश्न करीना हिने रणबीरला विचारला.तो म्हणाला आलिया वकील आहे .ती स्वतःची बाजू सिद्ध करत नाही तोपर्यंत शांत बसत नाही. भांडण झाल्यानंतर काही काळ अंतर ठेवतो. माझ्यात अहंकार नाही.काही चूक असेल किंवा नसेल मी सॉरी बोलून टाकतो . ‘जेव्हा भांडणे होतात. तेव्हा दोघेही एकमेकांना त्रास देण्यासाठी असं बोलतात, ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. मग समोरच्याला वाटतं तुम्ही असाच विचार करत आहात.म्हणून जपून बोलले पाहिजे .
COMMENTS