नवी दिल्ली । नगर सह्याद्री - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासरदारकी रद्द करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षां...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासरदारकी रद्द करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतः राहुल गांधी यांनीही मी घाबरणार नाही, लढत राहणार म्हणत भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडून त्यांच्या ट्विटर अकाउंटमध्ये मोठा बदल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये मोठा बदल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईलवर अपात्र खासदार असा उल्लेख केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता 'Dis’Qualified MP' असे पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. राजघाटवर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही काँग्रेसकडून आंदोलन होणारच असे सांगण्यात आले आहे.
COMMENTS