पारनेर | नगर सह्याद्री मतदारसंघातील गावांसह, वाड्यांवर रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, वीज या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्राधान्य दिले असून म...
पारनेर | नगर सह्याद्री
मतदारसंघातील गावांसह, वाड्यांवर रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, वीज या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्राधान्य दिले असून महाविकास आघाडीच्या काळात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत परंतु त्याचे श्रेय सध्या दुसरेच कुणीतरी घेत आहे.त्यामुळे विकास कामांचे श्रेय घेणारी टोळी जिल्हासह तालुयास उदयास आली असल्याची टिका आमदार निलेश लंके यांनी विरोधकांवर केली आहे.
लोणी हवेली येथे जलजीवन मिशनअंतर्गत १ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचे आमदार निलेश लंके यांचे हस्ते उदघाटन पार पडले. यामध्ये प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना (१ कोटी ९९ लक्ष ), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ( ७ लक्ष), व्यायामशाळा साहित्य( ५ लक्ष), दलितवस्ती बंदिस्त गटार ( ४ लक्ष), बचतगट इमारत बांधणे (३ लक्ष), कोल्हेमळा रस्ता काँक्रिटीकरण करणे ( ३ लक्ष ), दुधाडेमळा रस्ता काँक्रिटीकरण करणे ( २ लक्ष ), बारव परिसर सुशोभिकरण करणे ( ३ लक्ष), सार्वजनिक शौचालय बांधणे ( ३ लक्ष ) एवढया कामांचा शुभारंभ आमदार लंके यांच्या हस्ते पार पडला .
या अगोदर आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातुन हंगा ते लोणी हवेली व लोणी हवेली ते मुंगासवाडी डिकसळ माथा या रस्त्यासाठी १२ कोटी, लोणी हवेली ते जामगाव घाटमाथा रस्त्यासाठी १ कोटी ८७ लक्ष, वाडावस्ती डांबरीकरण व काँक्रिटीकरण ३५ लक्ष , कोल्हे मळा , आखारवस्ती व पारनेररोड डांबरीकरण ४५ लक्ष , खडकवाडी वस्तीशाळा १ वर्गखोली , गावठाण शाळा २ वर्गखोल्या , कोल्हेवस्ती अंगणवाडी इमारत ४० लक्ष, बारव महादेवमंदिर परिसर , स्मशानभूमी लाईट व्यवस्था , पाणी पुरवठा रोहित्र बसविणे ९ लक्ष रुपये , बिहार पॅटर्न अंतर्गत स्मशानभूमी व लोणी हवेली ते तराळवाडी रस्ता वृक्षलागवड, श्री गोपालकृष्ण मंदिर सभा मंडप १० लक्ष रु, जामगाव शिवपाणंद रस्ता ३० लक्ष रु मंजूर झाली आहेत. एवढी कामे गेल्या २ वर्षाच्या काळात गावामध्ये झाली, अशी सविस्तर माहिती बाजीराव दुधाडे यांनी प्रास्तविक करताना दिली .
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी लोणी हवेली ते पारनेर रस्ता तात्काळ करावा, अशी मागणी केली .आमदार निलेश लंके यांनी थोडयाच दिवसात तुमची पारनेर रस्त्याची मागणी पूर्ण करू, असे आश्वासन दिले . यावेळी वह्या व पेन देऊन आमदार निलेश लंके व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमानिमित्त उदघाटन सोहळा पार पडल्यानंतर ह. भ. प. प्रशांत महाराज कोटकर यांचे किर्तन झाले.यावेळी सरपंच जान्हवी दुधाडे, उपसरपंच अमोल दुधाडे ग्रा. सदस्य शिवाजी थोरे, अशोक कोल्हे, छत्रुघ्न नवघणे, सिमा कोल्हे, सुषमा दुधाडे, कोमल सोंडकर, भोयरे गांगर्डा सरपंच भाऊसाहेब भोगाडे, सरपंच भागाजी कदम, माजी चेअरमन बाबुजी माजी, सरपंच लहुअण्णा कोल्हे, परशुराम कोल्हे, बाळासाहेब जाधव, प्रा. संजय कोल्हे, किसन साठे, मच्छिंद्र कोल्हे , शरद जगताप हरिभाऊ कोल्हे, संभाजी थोरे, जयसिंग बाबुजी, अंकुश दुधाडे, मेजर सत्यवान सोंडकर, युवराज जगताप, युवराज कोल्हे, बाळकृष्ण कोल्हे, रामदास दुधाडे, बापू कोल्हे, बबलू जगताप, संकेत दुधाडे ,बबलू कोल्हे, बाळकृष्ण दुधाडे, शिवाजी कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष लिंबराज दाते, लहु साठे, ह. भ. प. किसन दुधाडे महाराज, वैजिनाथ कोल्हे , नामदेव थोरात, संजय थोरात, सत्यवान दुधाडे, कॉन्ट्रटर नरेंद्र पोळ, तुषार आडसुळ आदी उपस्थित होते.
COMMENTS