अहमदनगर | नगर सहयाद्री - पुणे नगर महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या बसची मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाववरुन निघालेल्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने पुणे ...
अहमदनगर | नगर सहयाद्री -
पुणे नगर महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या बसची मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाववरुन निघालेल्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने पुणे नगर महामार्गावर नारायण गव्हाण शिवारातपेट घेतला.या बसमधून तब्बल तीस प्रवाशी प्रवास करत होते. सर्वांचे नशिब चांगले म्हणून कोणाला काही झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, जळगाववरुन शुक्रवारी रात्री प्रवाशी घेऊन लक्झरी बस (क्रमांक MH 29 AW 5455) पुण्यासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते.नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले. बस चालक विलास गुलाब जुमडे यांनी सर्व ३० प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली.परंतु या घटनेत बस पूर्ण जळून खाक झाली होती.जळालेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहे.
बसमधून प्रवास करणाऱ्या ३० प्रवाशांचे दैव बलवत्तर होते. त्यामुळे कोणालाही काही झाले नाही. जळालेली बस पाहून दुर्घटना घडली असल्याचे लक्षात होते. परंतु सर्व प्रवाशी सुखरुप बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशमन दल दाखल झाले. सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले.
COMMENTS